औरंगाबाद- दिनांक २२/१२/२०१८ रोजी ०२.३० या ते ०३.३० वाजे दरम्यान औरंगाबाद जालना रोडवरील कुंभेफळ फाटयावरील एसबीआय शाखेचे एटीएम गॅसकटरने कापुन त्यामधील रोख रक्कम चोरण्याचा अनोळखी चोरट्यांचा प्रयत्न फसला होता. त्यावरुन बँकेचे मॅनेजर विक्रमसिंग केएरा नेगी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करमाड पोलिस स्टेशन येथे गुरनं ४२४/२०१८ कलम ३८०.५११,४२७ भादंवि प्रमाणे दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह
यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाच्या गुन्हेगारांची माहीती घेवून गुन्हा उघडकिस
आणण्याच्या सुचना दिल्या, त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक
पथक सदर गुन्हयाचा तपास करत होते. पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुलत यांनी
घटनास्थळाचे आजुबाजुचे सीसीटीव्ह फुटेज तपासले असता यांना घटनेच्या वेळी एक संशयीत
वाहन दिसुन आले. त्यांनी सदर वाहनाची बाजुला असलेल्या टोलनाक्यावरुन माहिती घेतली
असता सदरचा ट्रेलर हा आरआरसी ट्रान्सपोर्ट तटीयाबन रायपुर छत्तीसगड येथील असुन
तीचा क्रमांक सीजी-०४-जेसी-८६१२ असा असल्याचे दिसले.
त्यावरुन पोलिस उपनिरिक्षक दुलत यांनी नमुद चालकांबाबत वाहनांच्या बातमीदारांमार्फत माहिती घेऊन चालक अमरिकसिंग पिता हजारासिंग वर्ष (वय ३८) यांच्यासोबतचे क्लिनर १) जसविंदरसिंग ऊर्फ हंपी २)
हरपालसिंग ऊर्फ हॅपी पिता अमरजितसिंग वय ३० वर्ष रागंडीविंड ता.पटटी जितरनतारण राज्य
पंजाब यांना वर्धा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी
विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा
केल्याचे कबूल केले आहे.
यातील आरोपी हे गुन्हा करतांना त्यांचेकडील असलेले ट्रेलर गाडी एटीएमच्या समोर रोडवर उभा करतात व
त्यांच्यापैकी एकच इसम एटीएम मध्ये प्रवेश करुन गुन्हा करत असल्याचे समोर आले आहे. आरोपी गुन्हा करण्यापुर्वी सदर
ठिकाणाची आठ-दहा तास अगोदर रेकी करतात, स्वत:चे एटीएम कार्ड स्वाईप करुन त्यामध्ये पैसे आहेत की नाही याची
खात्री करुन पैसे असल्याची खात्री झाल्यानंतरच गुन्हा करण्याची योजना आखतात. यातील तिन्ही आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा कट महिनाभरापुर्वीच
आखलेला होता त्यासाठी त्यांनी रायपुर येथुनच एक मोठे गैस
सिलेंडर चोरले होते व नांदेड येथुन एक गॅसकटर विकत घेतले होते.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधिक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सफौ गणेश जाधव, सुधाकर दौड, पोह/विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे विठ्ठल राख, पोना/सागर पाटील, धिरज जाधव, संजय भोसले, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, संजय तांदळे, योगेश तरमाळेयांनी केली आहे. सदर
गुन्हयाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक
आमले, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे
करमाड येथील पो.नि.रायकर, पो.उपनि प्रदिप भिवसने, पोह/ दाणी, श्रीमंत भालेराव, नागनाथ केंद्रे, ज्ञानेश्वर बेले, राहूल मतमल हे करीत आहे